दिल्लीत लॉकडाऊनची शक्यता; सोमवारपासून शाळा देखील बंद राहणार

नवी दिल्ली | गेल्या काही वर्षांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये प्रदुषण ही मुख्य समस्या आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कडक पावलं उचलली आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी एक आठवडा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांच्या निर्णयानुसार येत्या सोमवारपासून एक आठवडा शाळा बंद असणार आहे. तसेच सरकारी कार्यालयसुद्धा बंद असणार आहेत.

सरकारी कार्यालय बंद असून सर्वांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आढावा बैठक बोलावली होती.

सद्य स्थितीत दिल्लीत हवा प्रदुषणाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अनेक भागात श्वास घेणं देखील कठीण झालं आहे. यावर अरविंद केजरीवाल निर्णायक पावलं उचलण्याची शक्यता आहे. केजरीवाल दिल्लीत सरकार लॉकडाऊन लावण्याचा देखील विचार करत आहे.

दरम्यान, शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. खासगी क्षेत्रातील लोकांनाही शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

दिल्ली प्रदुषण समस्येच्या तीव्रतेमुळे त्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वायू प्रदुषणावर उपाय म्हणून काही दिवसांकरिता लॉकडाऊन लावण्यात यावा का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे.

एक्युआयची पातळी दिवसेंदिवस वाढत असून प्रदुषित हवेमध्ये राहणं मुश्किल झाल आहे. एनव्ही रमणा यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयाकडून ही विचारणा करण्यात आली आहे.

कोरोना महामारीत दिल्लीत प्रदुषणाची पातळी वाढली असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक  सरासरी 462 इतका नोंदवला गेला आहे.

वाढलेली प्रदुषणाची मात्रा पाहता अरविंद केजरीवाल यांनी 14 ते 17 नोव्हेंबर दरम्यान दिल्लीत बांधकामाची कामे बंद ठेवण्याचाही निर्णय घेतला आहे.

शाळेतील मुलांनी प्रदुषित हवेत श्वास घेऊ नये याकरिता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुलांच्या काळजीसाठी घेतला आहे, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजप-मनसे युती होणार का?; रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं…

“तुला लईचं कळतं रं, रोहितला त्रास होईल म्हणून ऐकूण घेतोय नाहीतर…”

‘…तर तुमचं ‘कोल्हापुरी पायतान’ हातात घ्या’; राजू शेट्टी आक्रमक

“आज बाळासाहेब असते तर संजय राऊतांच्या थोबाडीत मारली असती”

…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार – कंगना राणावत