मुंबई | भारतीय डाक विभाग (Post Office) सातत्यानं नवीन योजना घेऊन येत आहे. त्याचा ग्राहकांना लाभ देखील होत असतो. परिणामी पोस्टाच्या योजनांचा लाभ मिळवणारे अनेकजण आहेत. अशात एक योजना सध्या चर्चेत आहे.
योजनेच्या माध्यमातून योग्य गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा देखील मिळाला आहे. फायद्यासोबतच कर बचत होत असल्यानं सध्या पोस्टाची एक योजना चर्चेत आहे.
पोस्टाची नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट ही योजना कर बचतीसाठी देखील ओळखली जाते. कसलाही धोका आणि अडचण नसलेली योजना म्हणून या योजनेला ओळखलं जातं.
बचत योजनेसारखा फायदा देखील या योजनेत होतो. परिणामी या योजनेत गुंतवणूक करण्याचे प्रमाण जास्त आहे. एनएससी योजना ही लोकप्रिय योजना आहे.
एनएससीमध्ये 6.8 टक्के व्याज दर मिळतो परिणामी गुंतवणुकदाराला फायदा होतो. किमान 1 हजार रूपये गुंतवणूक करता येते. त्यावर 6.8 टक्के दरानं व्याज मिळते.
या योजनेत फक्त 100 च्या पटीत गुंतवणूक करता येते. या योजनेत तुमचे पैसे 10 वर्ष आणि 6 महिन्यात 6. 8 टक्के व्याजदराने दुप्पट होतात. परिणामी ही फायदेशी योजना आहे.
जर तुम्ही पाच वर्षात एकूण 1000 रूपये गुंतवल्यास म्यॅच्युरिटीवर गुंतवणूकदाराला 1389 रूपये प्रमाणात पैसे मिळतील. अशाप्रकारे या योजनेत अनेक फायदे मिळतात.
दरम्यान, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 10 वर्ष वय असावे लागते. वय 10 पेक्षा कमी असेल तर पालकांकडून खात्यावर नजर ठेवली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर नियमाच्या कलम 80 सी नूसार तब्बल 1.5 लाखांचा फायदा मिळतो.
महत्त्वाच्या बातम्या –
शिवसेना भवन परिसरात मनसेची बॅनरबाजी, हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलं
काळजी घ्या! यंदाचा मार्च महिना ठरलाय सर्वाधिक उष्ण; तब्बल 122 वर्ष जुना ‘हा’ रेकाॅर्ड मोडला
‘देशातील महागाई कमी होवो…’, म्हणत गिरीश बापटांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
“भाजपमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं”