नवी दिल्ली | दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता देशातील अनेक राज्यांनी पुन्हा एकदा निर्बंध लादायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली.
भारतासारख्या देशाला कोरोनाला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूचा उपयोग नाही, असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी केलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर भारतासारख्या देशाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दलचा सल्ला देखील सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे.
कोरोनाला रोखायचं असेल तर नाईट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. भारतासारख्या देशांनी या विषाणूला आवर घालायचा असेल तर वैज्ञानिक आधारांवर धोरण ठरवायला हवं, असा सल्ला सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे.
कोरोनाला आळा घालायचं असेल तर विज्ञानावर आधारित, पुराव्यावर आधारित उपाययोजना करण्याची आवश्यकता जास्त आहे.अशा उपाययोजनांची यादी केली पाहिजे, नाईट कर्फ्यूला काही आधार नाही, असं स्पष्ट मत स्वामीनाथन यांनी व्यक्त केलं आहे.
मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जाहीर कार्यक्रमांमुळे, मनोरंजनाच्या ठिकाणी विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे अशा ठिकाणांवर निर्बंध टाकणं हे सहाजिक आहे, असंही स्वामीनाथन म्हणाल्या.
निर्बंध लादले तरी भारतीयांनी घाबरून जाऊ नये. पण नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे, अशा सूचना सौम्या स्वामीनाथन यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, भारतात ओमिक्रॉनच्या प्रसाराची ही तर सुरूवात आहे. या केसेसमध्ये आणखी वाढ होऊ शकते. पुढे जाऊन मोठ्या लोकसंख्येला ओमिक्रॉनची लागण होण्याची शक्यता आहे, अशी भीती सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”
‘… तर 2022 मध्ये कोरोना संपणार’; WHO प्रमुखांनी दिली दिलासादायक माहिती
गुड न्यूज! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त
“लगान टीमनेच इंग्रजांना पळवून लावलेलं, महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेबाहेर आहेत तेही लगान टीममुळेच”
मोठी बातमी! वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांसह 12 भाविकांचा मृत्यू