“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”

मुंबई | ओमिक्रॉनने भारतामध्ये देखील शिरकाव केला असून, भारतामध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 976 वर पोहोचला आहे. कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव अधिक गतीने होत असल्याचे दिसून येत आहे.

ओमिक्रॉनचा वेग पहाता मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भाजपच जबाबदार असल्याचं नवाब मलिक म्हणालेत. भाजपमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी भाजपवर तसेच नरेंद्र मोदींवर केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय. भाजपच्या याच विजयाबद्दल बोलताना नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे.

गल्लीत क्रिकेट जिंकणाऱे वर्ल्ड कप जिंकू असं म्हणत आहेत, असं म्हणत मलिक यांनी नारायण राणे तसेच भाजपला खिजवलं आहे. तसेच विरोधकांनी केलेल्या आरपोंना तेवढ्याच क्षमतेने तोंड देणारे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली असून नव्या वर्षात अनेक घोटाळे समोर आणणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

पक्ष बघून आम्ही फर्जीवाडा बाहेर काढत नाही. ज्यांनी चुकीचे काम केले ते समोर येईल. त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. मंदिर तसेच मशिदीची जमीन लुटणारे नेते आणि अधिकारी आहेत, असं देखील नवाब मलिक म्हणालेत.

काही लोक बँका बुडवत आहेत. भाजपमध्ये गेल्यावर ईडी गप्प का बसत आहे. मंदिर तसेच मशिदीची जमीन हडप केली जात आहे. नवीन वर्षात नवे फर्जीवाडे समोर आणणार आहे. माझ्यावर कोणी कितीही अब्रुनुकसानीचा दावा करुद्या, मी थांबणार नाही. जे केल आहे त्याचा हिशोब द्यावा लागेल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार” 

गुड न्यूज! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त 

धक्कादायक! मुंबईतील 55 टक्के कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यात आढळला ओमिक्रॉन 

‘…तर कठोर निर्णय घ्यावा लागेल’; अजित पवारांनी दिले मोठे संकेत

‘कोरोनाच्या आणखी अनेक लाटा येतील, कारण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती