“राम मंदिराला न्याय मिळवून देणारे गोगाई अन् बाबरीची घुमटे पायापासून उध्वस्त करणारी शिवसेना कुठेच नाही”

मुंबई | अयोध्येत आज ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे. मात्र, राम मंदिराच्या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे, हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील असं म्हणत शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका केली आहे.

न्या. रंजन गोगाई यांनी रामाला त्या गोंधळातून बाहेर काढलं आणि स्पष्ट निकाल राम मंदिराच्या बाजूने दिला. रामाला न्याय मिळवून देणारे गोगाई विशेष निमंत्रणात कुठेतरी दिसायला हवे होते. मात्र, ते निमंत्रणात कुठेच नाहीत. असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

त्याबरोबरच, बाबरीची घुमटे ज्यांनी पायापासून उखडून टाकली. बाबरी मस्जिद ज्यांनी उध्वस्त केली. ते शिवसैनिकही निमंत्रणात कुठेच नाहीत. राम मंदिराच्या भूमीपूजनाचे श्रेय दुसऱ्या कोणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टाहास! असं म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, बाबरीच्या पतनाने संघर्ष संपला. राम मंदिराच्या भूमीपूजनाने या प्रश्नाचे राजकारणही कायमचे संपावे. अशी इच्छा शिवसेनेने सामनामधून व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान मोदींचं प्रभू श्रीरामांना साष्टांग दंडवत; भूमिपूजन स्थळी दाखल

राम मंदिर पायाभरणीच्या दिवशी असदुद्दीन औवेसींचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

शिवसेनेचा लखलखता तारा निखळला; 25 वर्ष आमदारकी बजावणाऱ्या ‘या’ माजी मंत्र्याचं निधन

मुख्यमंत्रिपदावर असताना मुलीच्या मार्कांमध्ये निलंगेकरांनी बदल केला होता

कोरोनाच्या उपचारानंतर ‘या’ व्याधींना तोंड द्यावं लागू शकतं; जाणून घ्या