पवार कुटुंबात काहीतरी गडबड आहे- सुरेश धस

मुंबई : आमच्या घरात सगळं काही आलबेल आहे, असं सांगायची वेळ का येते? याचा अर्थ शरद पवार यांच्या कुटुंबात काहीतरी गडबड आहे, अशा शब्दात भाजपचे विधानपरिषदेवरील आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना डिवचल आहे. धस यांनी गेल्या वर्षी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरला होता.

बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी  सुरेश धस बोलत होते.

आपल्याकडे एखाद्या कांद्याला काही झालं, तर तो आपण बाजूला काढून ठेवतो, नाहीतर सगळ्या पोत्याचीच वाट लागते. तसं काही झालं असेल, अशी बोचरी टीकाही सुरेश धस यांनी केली. 

टीव्हीला बातम्या यायला लागल्या की पवारांच्या घरात काहीतरी चाललं आहे. अमकं चाललंय, तमकं चाललंय. आणि हे इकडे तरीही आमच्यात तसं काही नाही म्हणतात. आमच्या घरात सर्व आलबेल आहे. अहो, तुमच्या घरात काही नाही चाललं, हे सांगायची पाळी का येते?, काहीतरी असल्याशिवाय ही वेळ येते का?,असा सवाल सुरेश धस करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

शरद पवार यांचे पुतणे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणालाही न सांगता आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पवार कुटुंबात धुसफूस सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. 

महत्वाच्या बातम्या-