भाजपकडून पक्षातून ‘या’ चार नेत्यांची हकालपट्टी

मुंबई : सेना-भाजप युती जाली असली तरी पक्षातील अनेक नेते बंडखोरी करत आहेत. बंडखोर नेते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत होते. सर्वांनी उमेदवारी मागे घ्यावी, असं पक्षानं आवाहन पक्षाकडून करण्यात आलं. पण बंडखोरी केल्यामुळे पक्षाने हकालपट्टीची कारवाई केली आहे.

अर्ज मागे न घेणाऱ्या बंडखोरांची भाजपने हकालपट्टी केली आहे. चरण वाघमारे, गीता जैन, बाळासाहेब ओव्हाळ आणि दिलीप देशमुख या उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. 

मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात माजी महापौर गीता जैन यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने अर्ज मागे घेण्याचं आवाहन करुनही त्या अपक्ष लढण्यावर ठाम राहिल्या.

विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना डावलून भाजपने जिल्हा अध्यक्ष प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिल्याने वाघमारे हे नाराज झाले. बाळासाहेब ओव्हाळ यांच्या जागी गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप देशमुख यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार विनायक पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-