डॉक्टरांचा गंभीर इशारा! कोरोना लस घेतल्यानंतर ‘हे’ 5 दुष्परिणाम दिसू शकतात

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारीनं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञ कोरोना लशीवर संशोधन करत आहेत. काही देशांमध्ये या लशीचं वितरण सुरु करण्यात आलं आहे. तर काही देशांमध्ये या लशींवर काम सुरु आहे. सध्या ज्या लशी सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे त्या लशी घेतल्यावर काही साईड इफेक्ट्स दिसतील, असा इशारा डॉक्टर्स आणि औषध कंपन्या देत आहेत.

कोरोना लस घेतल्यानंतर अॅलर्जी किंवा त्याचे खतरनाक साईड इफेक्ट्स दिसू शकतात. कोरोनावरील अनेक लशींच्या ट्रायल्समध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना असे साईड इफेक्ट झाल्याचं दिसून आलं आहे.

कोरोना लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीआपण या लशींच्या दुष्परिणामांकडे लक्ष दिले पाहिजे. त्याच्याशी सामना करण्यासाठी आपण पूर्णपणे तयार असले पाहिजे. कोरोना लस घेतल्यानंतर होऊ शकणाऱ्या साईड इफेक्ट्स विषयी आज आपण जाणून घेवूयात.

1) ताप येणे किंवा थंडी वाजणे – मोडर्नाच्या लसीनंतर एका स्वयंसेवकात ताप आणि तीव्र सर्दीसारखे दुष्परिणाम दिसून आले होते. लस घेतल्यानंतर काही तासांतच त्या व्यक्तीला खूप जास्त ताप आला होता. बहुतेकवेळा जेव्हा शरीरात अँटीबॉडी तयार होतात तेव्हा हलका ताप येत असतो.

2) डोकेदुखी – लस घेतल्यानंतर आपल्याला डोकेदुखी सुद्धा होऊ शकते. याशिवाय मानसिक ताण, चिडचिडेपणा आणि मनःस्थिती बदलणे यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. कोणत्याही प्रकारच्या संसर्गात, लसीकरणानंतर 50 टक्के रुग्णांना या समस्येचा त्रास होतो.

3) उलट्या होणे किंवा मळमळ होणे – कोरोनावरील लस घेतल्यानंतर उलट्या होणे किंवा मळमळ होणे यांसारखे साईड इफेक्ट्स देखील दिसू शकतात. मोडर्नाच्या लसीनंतर एका स्वयंसेवकाला बराच वेळ उलट्या, मळमळ होणे आणि भीती वाटणे हे साईड इफेक्ट्स दिसले होते.

4) स्नायू वेदना – ज्या ठिकाणी इंजेक्शनद्वारे रुग्णाला लस दिली जाते त्या ठिकाणी बहुधा स्नायू दुखणे आणि सूज येणे ही समस्या उद्भवते. मोडर्ना, फायझर आणि ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका या सर्वांनीच लशीकरणानंतर समान दुष्परिणाम नोंदवले आहेत.

5) मायग्रेन – एका साईडला डोकेदुखी किंवा मायग्रेन सारखी समस्या देखील लशीकरणानंतर उद्भवू शकते. एका अहवालानुसार फायझरच्या लसीच्या चाचणीत भाग घेतलेल्या एका स्वयंसेवकाने लसीकरणानंतर तीव्र मायग्रेनची नोंद केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता! चार महिन्यात सोनं साडेसात हजाराहून अधिक तर चांदी पंधरा हजाराहून अधिक उतरली; वाचा सविस्तर

मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणावर काय परिणाम होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

भाजपच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा जागीच मृ.त्यू

खुशखबर! “डिसेंबर मध्येच लशीला परवानगी मिळेल अन् जानेवारीत लशीकरण चालू होईल” – आदर पुनावाला

धनंजय मुंडेंची लहान बहिणीला भावनिक साद, पंकजा मुंडेंचा काय प्रतिसाद?