जाणून घ्या! शरीराला मजबूत बनवणाऱ्या आवळ्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

दैनंदिन जीवनात हिरव्या भाज्यांसह आवळ्याचेही सेवन केल्यास ते आपल्या आरोग्यासाठी गुणकारी ठरेल. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. आवळा पोषणाचं काम करतो. म्हणून आयुर्वेदात त्याला धात्री असंही म्हणतात. आवळ्याचे खात असाल त्यामध्ये आवळ्याची सुपारी, लोणचे सरबत, मोरावळ इत्यादी आहेत. आवळा खाल्ल्याने शरीरातील अनेक आजार दूर होण्यास मदत मिळते.

आवळ्याचे आरोग्यदायी फायदे – 

1. आवळ्यामध्ये व्हिटामिन बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध प्रमाणात आढळते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँ.टी ऑ.क्सिडेंट असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

2. आवळ्यामध्ये कोलेस्ट्रॉल घटवण्यास उपयुक्त असे गुणधर्म आहेत. यामुळे हृदयाशी संबंधित विकारांपासून बचाव होतो आणि यामुळे प्राणघा.तक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित आजारांचा धोका देखील कमी होतो.

3. आवळ्याचे नियमित सेवन केल्यानं स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढते.

4. आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असल्याने पांढर्‍या रक्त पेशींचे प्रमाण वाढते. आपली रोगप्रतिकारशक्ती याच पेशींवर अवलंबून असते.

5. रोज आवळा खाल्ल्याने आपला चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो. त्यामध्ये उपस्थित अँ.टी ऑ.क्सिडेंट त्वचेच्या वृद्धत्वाची समस्या कमी करतात. रस पिण्यामुळे सुरकुत्या आणि फाईन लाईन कमी होतात. हे शरीराला डिटॉक्स करण्याचे कार्य देखील करते.

6. आवळ्यामध्ये लोह, झिंक यासारखे खनिजे आणि पॉलीफेनोलसारखे संयुगेही असतात, ज्यामुळे त्वचेशी संबंधित विकार दूर होण्यास मदत मिळते.

7. भरपूर कॅल्शियम असल्याने आवळा सेवन केल्यास हाडे मजबूत होतात. ऑस्ट्रोपोरोसिस, अर्थराईटीस आणि हाडांच्या समस्यांमध्ये आराम मिळतो.

8. आवळ्याचे रोज सेवन केल्याने तोंडातून दुर्गंधी येत नाही, तसेच दिवसभर फ्रेशनेस देखील जाणवतो.

महत्वाच्या बातम्या –

गॅस सिलेंडरच्या दराचा भ.डका! गेल्या 30 दिवसांत चाैथी वाढ, पाहा किती रुपयांनी महागला?

राठोडांनंतर आता धनंजय मुंडे देखील राजीनामा देणार? पंकजा मुंडे म्हणाल्या…

पुण्यातील ‘या’ ठिकाणी फुकट वडापाव खालल्याने गजा मारणेवर गु.न्हा दाखल

राठोडांकडून 5 कोटी रुपये घेतल्याच्या त्या आरोपावर पूजाच्या वडिलांनी अखेर माैन सोडलं, म्हणाले…

मुंबईतील नाईट लाईफवरुन देवेंद्र फडणवीस आ.क्रमक, राज्य सरकारवर टीका करत म्हणाले…