कोरोनाच्या उपचारानंतर ‘या’ व्याधींना तोंड द्यावं लागू शकतं; जाणून घ्या

मुंबई | सध्या देशात कोरोनानं कहर घातला आहे. अनेक रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत तर, अनेक रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. मात्र, बऱ्या झालेल्या काही रुग्णांला उपचारानंतरही काही व्याधींना तोंड द्यावं लागत आहे.

कोरोनाच्या यशस्वी उपचारानंतर घरी गेलेल्या 22 रुग्णांना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना पुन्हा परळ येथील केईएम रुग्णालयात भरती व्हावं लागलं आहे. या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आलं. या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली तर त्याचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

वैद्यकीय भाषेत उपचारानंतर उद्भवणाऱ्या या अशा व्याधींना ‘पोस्ट इन्फेक्शन फायब्रोसीस’ असं म्हणतात. जर कोणत्या आजारात फुफ्फुसाचा सहभाग मोठ्या प्रमाणात असेल तर, उपचारानंतर देखील काही रुग्णांच्या फुफ्फुसावर व्रण कायम राहतात.

यामुळे फुफ्फुसाची काम करण्याची गती मंदावते. फुफ्फुसाची कार्यशक्ती मंदावल्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी काही रुग्णांला तात्पुरते रुग्णालयात दाखल करून योग्य ते उपचार घेऊन घरी जाता येते. तर, काही रुग्णांला ऑक्सिजन मशीनचा वापर घरीच करावा लागतो.

महत्वाच्या बातम्या-

अखेर तो दिवस आला, अयोध्यानगरी सज्ज झाली; आज ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन

‘…नाहीतर अमेरिकेला परिणाम भोगावे लागतील’; चीनची अमेरिकेला धमकी

…तेव्हा अमृता फडणवीसांना मुंबई असुरक्षित वाटली नाही का?; रेणुका शहाणेंची मिसेस फडणवीसांवर टीका

पुणे हादरलं! दारूसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्यानेच कटर ने वार करत मुलीचं डोकं फोडलं

ऐकावं ते नवलंच! कैदी मुलाला सोडवण्यासाठी आईने खोदलं भलं मोठं सुरंग पण…