अखेर तो दिवस आला, अयोध्यानगरी सज्ज झाली; आज ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन

लखनौ | गेल्या कित्येक वर्षांपासून देशवासीय राम मंदीर सोहळ्याच्या प्रतिक्षेत होते. सर्वांचे डोळे या ऐतिहासिक क्षणाकडे लागून होते. आज अखेर तो दिवस आला आहे. अवघ्या काही तासांमध्ये अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे.

भूमिपूजन सोहळ्यासाठी देशभरातून संत, महंत, भक्तगण, अयोध्येत पोहचले आहेत. सर्वांच्या भक्तिमय जल्लोषात अयोध्यानगरी नाहून निघाली आहे. भूमीपूजनाला 36 परंपरांच्या 135 संतांनी उपस्थिती लावली आहे. त्याबरोबरच जवळपास 1500 ठिकाणांहून माती तर, 2000 ठिकाणांहून पवित्र जल अयोध्येत आलं आहे.

आज दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी सकाळी 9.30 च्या सुमारास दिल्लीहून निघणार आहेत. साधारणपणे 11.30 च्या सुमारास मोदीजी अयोध्येत दाखल होतील.

दरम्यान, अयोध्यानगरिमध्ये मोदींच्या सुरक्षेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. एनएसजी कमांडोंसह चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

…तेव्हा अमृता फडणवीसांना मुंबई असुरक्षित वाटली नाही का?; रेणुका शहाणेंची मिसेस फडणवीसांवर टीका

पुणे हादरलं! दारूसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्यानेच कटर ने वार करत मुलीचं डोकं फोडलं

ऐकावं ते नवलंच! कैदी मुलाला सोडवण्यासाठी आईने खोदलं भलं मोठं सुरंग पण…

…तर अमृता फडणवीसांना राज्य सोडून जावं लागेल, हाच उपाय ; शिवसेना मंत्र्यांची फडणवीसांवर टीका

समुद्रात अडकले सुमारे 1 लाख मच्छीमार; प्रशासन अजूनही शांत