पुणेकरांसाठी गुड न्यूज; आजपासून ‘या’ गोष्टी पुन्हा सुरू होणार

मुंबई | पुण्यातील रुग्णवाढ हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं दिसून आल्यामुळे अखेर जमावबंदीचं कलम 144 रद्द करण्यात आलं आहे. तसंच पुणे पुन्हा एकदा निर्बंधांतून शिथिल होत असून पर्यटन स्थळांसह अनेक गोष्टी आजपासून पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेनं सुरु होणार आहेत.

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तशी माहितीही रविवारी संध्याकाळी जारी केली होती. गेल्या 15 दिवसांच्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेऊन अखेर पुण्यासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे, सॅनिटायझेन याबाबतच्या नियमांचंही काटोकेरपणे पालन करणं बंधनकारक असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी म्हटलंय.

पुण्यातील सर्व जलतरण तलाव, खुली मैदाने, पर्यटनाच्या ठिकाणी असलेली सर्व दुकाने, हॉटेल्स आणि पर्यटन स्थळे आजपासून खुली करण्यात येत आहे.

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रविवारी सायंकाळी तसं जाहीर केले. तसंच या आदेशानुसार लागू असलेले कलम 144 रद्द करण्यात आलं आहे.

वाढत्या ओमिक्रॉन रुग्णांचा धोका लक्षात घेऊन पुण्यात निर्बंध जारी करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या 15 दिवसांची आकडेवारी जर पाहिली, तर त्यात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे.

अखेर पुण्यातील निर्बंध शिथिल केले जा आहेत. याबाबच सर्व विभाग प्रमुख, टास्क फोर्स आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठकही पार पडली होती. त्यानुसार आजपासून अखेर सर्व दुकानांसह, हॉटेल, पर्यटनस्थळं, जलतरण तलाव आणि खुली मैदानं पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“ज्याची बायको पळून गेली, त्याचं नाव मोदी ठेवलं” 

“…मग बघू कोण सरस ठरत ते”; उद्धव ठाकरेंचं थेट अमित शहांना आव्हान 

 “मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे आणि तलवार जरी हातात नसली तरी…”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

 निधनाच्या अफवांवर लता मंगेशकर यांनीच केलं ट्विट, म्हणाल्या…

  येत्या 2 दिवसात ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा