मुंबई | ईडीने आपला मोर्चा आता राष्ट्रवादीकडे वळवल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. मुंबईतील त्यांच्या सीजे हाऊसमधील घरावर टाच आणण्यात आली आहे.
इकबाल मिरची (Iqbal Mirchi) प्रकरणात ईडीने ही कारवाई केल्याचं समजतंय. याच इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर असलेली पटेल यांची मालमत्ता ईडीने यापूर्वीच जप्त केली आहे. सीजे हाऊस ही बिल्डिंग वरळीत, अॅट्रिया मॉलच्या समोरच्या परिसरात आहे. याच ठिकाणी ईडीने कारवाई केली आहे.
प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते अतिशय निकटवर्तीय आहेत. सध्या ते राष्ट्रवादीचे राज्यसभेवर खासदार आहेत. युपीएचे सरकार सत्तेत होते तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात ते विमानोड्डाण मंत्रीही होते.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, ईडीच्या रडारवर आत्तापर्यंत शिवसेना होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल आले आहेत. त्यांनी इक्बाल मिर्चीच्या कुटुंबासोबत व्यवहार केले होते.
जो करार केला होता त्या करारात इक्बाल मिर्चीने जागा दिली होती. त्यानंतर हा व्यवहार वादग्रस्त ठरला होता. मात्र हा व्यवहार कायदेशीर होता, असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘महाराष्ट्रातही धर्मांतर विरोधी कायदा करा’; नितेश राणेंची सरकारकडे मागणी
उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले…
यंदाचे सर्व सण धुमधडाक्यात साजरे होणार, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
‘शिवसेना फोडण्यामागे शरद पवार नाही, तर…’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य
“शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच”