मुंबई | शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर आरेमधील मेट्रोच्या कारशेडपासून ते नामांतरणापर्यंतच्या अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले आहेत.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही बंडखोरी करुन भाजपासोबत आल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं जातंय. अशातच आता या नव्या सरकारकडे भाजपाच्या एका आमदाराने धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात आणण्याची मागणी केली आहे.
आता महाराष्ट्रात भगवाधारी सरकार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा हीच वेळ आहे, असं नितेश राणे म्हणालेत.
आपण भोळ्या महिलांना यामध्ये अडकण्यापासून आणि त्यामधून होणाऱ्या छळपासून वाचलं पाहिजे, असंही नितेश राणे म्हणालेत. तर ट्वीटच्या शेवटी त्यांनी लवकरच हा कायदा आणूयात, जय श्रीराम, असं म्हटलंय.
दरम्यान, भाजपाची सत्ता असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये राज्य स्तरावर धर्मांतर विरोधी कायदा पारीत करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशसारख्या प्रमुख राज्यांचा समावेश आहे.
अनेक राज्यांत सध्या जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे धर्मांतर बंदी कायद्याची मागणी सातत्याने केली जात असल्याचं दिसून येतं.
महत्त्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले…
यंदाचे सर्व सण धुमधडाक्यात साजरे होणार, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
‘शिवसेना फोडण्यामागे शरद पवार नाही, तर…’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य
“शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच”
“एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवली तर बापाचं नाव लावणार नाही”