भोपाळ | तळीरामांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेश या राज्यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांनी दारूवरील उत्पादन शुल्कात 10 टक्के कपात केली आहे, या निर्णयानंतर राज्यातील दारूच्या किमती कमी होतील. दारूची किंमत प्रति बाटली 50 ते 500 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.
या निर्णयानंतर विदेशी मद्याचे दर 50 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत कमी होतील. व्हिस्की, बिअर, वाईन या सर्वांच्या किमती कमी होतील. याशिवाय देशी दारूही स्वस्त होणार आहे. देशी दारूचा 110 रुपयांना मिळणारा पाव 85 रुपयांना मिळणार आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी दारूवरील मार्जिन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मद्य धोरण सरकार 1 एप्रिलपासून लागू करणार आहे.
शुक्रवारी शिवराज मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात हेरिटेज दारू बनविण्यास मान्यता देण्यात आली.
या निर्णयामुळे आदिवासींची आर्थिक स्थिती मजबूत होईल. ते महू येथून दारू बनवून विक्री करू शकतील, असं शिवराज सिंह चौहान म्हणालेत.
दरम्यान, नवीन दारू धोरणानुसार राज्यातील एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर तो खासगी परवाना घेऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; विधानसभा अध्यक्षपदाबाबत महत्त्वाची माहिती समोर
“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”
कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात! कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले; वाचा भाव
कोरोनाचा पुन्हा उद्रेक! चीन सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; भारतासह जगावर परिणाम होणार
मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय