महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; विधानसभा अध्यक्षपदाबाबत महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा राज्य सरकारचा (Maharashtra Government) प्रस्ताव परत पाठवला आहे.

हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्याने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करु शकत नाही, असे सपष्टीकरण राज्यपालांनी दिलं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक या अधिवेशनात होणार नाही, असे स्पष्ट संकते आता मिळाले आहेत.

विधानसभा अध्यपदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरुन भाजपने (BJP) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. यामुळे राज्यपालांनी निवडणूक प्रस्ताव परत पाठवत निवडणूक पुढे ढकलली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून रखडली आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ही निवडणूक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण राज्य सरकारचा आवाजी मतदानाबाबतच्या निर्णयावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता.

विशेष म्हणजे हा संघर्षाची धार आता कमी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यामुळे राज्यपाल राज्य सरकारच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला परवानगी देतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण राज्यपालांनी अखेर या निवडणुकीचा प्रस्ताव परत पाठवला आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session 2022-23) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा तिढा सुटणार, अशी आशा राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून व्यक्त केली जात होती.

महत्वाच्या बातम्या- 

“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा” 

कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात! कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले; वाचा भाव

 कोरोनाचा पुन्हा उद्रेक! चीन सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; भारतासह जगावर परिणाम होणार

  मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

 मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल