कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्यांची सलमान खान अशाप्रकारे करतोय मदत

मुंबई|  देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढत चाललाय. देशभरातील अनेक कोरोना योद्धे गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून आपल्याला वाचवण्यासाठी लढत आहेत. या लढाईत अनेक योद्ध्यांना कोरोनानं ग्रासलं देखील. तसेच अनेक डॉक्टर्स, नर्सेस यांनी या लढाईत आपले प्राण देखील गमावले आहेत.

दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

कोरोना काळात मदतीची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत अभिनेता सलमान खान स्वतः  रस्त्यावर उतरून मदत करत आहे. कोरोनाच्या काळात मुंबई पोलीस भर उन्हात रस्त्यावर उभं राहून काम करत आहेत. तर आपले फ्रंटलाईन वर्कर दिवस-रात्र काम करत आहेत. या सगळ्यांसाठी सलमान खान जेवणाचं अभियान राबवत आहे. यामध्ये सलमान खानचे फूड ट्रक जेवणं घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.

सलमानननं रविवारी राज्यातील तब्बल 5000 लोकांना अन्न आणि पाण्याचं वाटप केलं. युवा सेनेचे सदस्य राहुलएन कानल यांनी सलमानचे अन्न वाटप करत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन त्याचे आभार मानले आहेत.

मुंबईत लोकांना ग्रोसरी शॉपमध्ये 4 तास लांब रांग लावावी लागत आहे. राहुल कानल म्हणाले की,’या फूड ट्रकमध्ये कोरोना वॉरिअर्स आणि इतर गरजू लोकांना मदत केली जात आहे. Being Hungry हा फूड ट्रक मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहे. याच्या माध्यमातून फूड किट, चहा, बिस्किट, मिनिरल वॉटर, नाष्टा यासारखे पदार्थ दिले जातात.’

भाईजाननं केलेल्या या मदतीसाठी त्याची सर्वत्र स्तुती केली जाते. दरम्यान त्यानं अशीच लोकांची मदत करावी अशीही विनंती त्याला केली जात आहे.

सलमान खानचे ‘Being Hungry’ नावाचे फूड ट्रक रस्त्यावर उतरले आहे. यांच्यामाध्यमातून हजारो लोकांना जेवण देत आहे. या ट्रकमधून फक्त कोरोना वॉरिअर्सच नाही तर गरीब आणि गरजू लोकांना देखील अन्न दिलं जातं.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्यातील लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे.

https://www.facebook.com/photo/?fbid=2968329246778400&set=a.1513206998957306

महत्वाच्या बातम्या – 

अंतराळातून पृथ्वी नेमकी कशी दिसते?, जाणून घेण्यासाठी पाहा…

‘अक्षयवर 500 कोटी लावतील पण माझ्यावर…..’,…

याआधी तुम्ही फुलपाखराचं ऑपरेशन पाहिलंत का?, नसेल पाहिलं तर…

‘पैसा आणि ओळख यांना कोरोना ओळखत नाही’ फुलवा…

‘महासत्ता होणार म्हणे…महाथट्टा नक्कीच झालीय’…