‘गावरान मुंडे’नंतर आता ‘हे’ Rap Song सोशल मीडियावर घालतय धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

तर त्यात काही गाण्यांचेही व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात. आता मध्येच ‘खासरे म्युझिक’ प्रस्तुत गावरान मुंडे हे रॅप साॅंग सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. या गाण्यावर अनेकांनी व्हिडीओ शूट करून आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवर शेअर केले होते.

तुम्हाला माहितच असेल सध्या इंस्टाग्रामवर रिल्स बनवण्याचा किती ट्रेंड सुरू आहे. मागिल काही दिवसांपूर्वी गावरान मुंडे या गाण्यावर अनेकांनी रिल्स बनवले होते.

या गाण्यानंतर आणिखी एक नवीन भन्नाट गाणं ‘खासरे म्युझिक’ यांनी आणलं आहे. यावेळी त्यांनी ऊसाच्या रसावर गाणं तयार केलं आहे. या गाण्याची भाषा फूल गावरान असल्यामुळे सोशल मीडियावर हे रॅप साँग खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘पांडबाच्या रानातला ऊसाचा रस’ असं हे गाण आहे. सिंगर लुईस पॉन्सी आणि डॅडी यांकी याच्या ‘डेस्पसीतो’ या गाण्याच्या चालीवर या तरुणांनी रॅप सॉंग बनवलं आहे.  या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

या गाण्याचं नाव ‘ऊसाचा रस’ असं असून, या गाण्याची सुरूवात उन्हाळा 2021 अशानी होते. आता सध्या सगळीकडे कडक उन्हाळा पडला आहे. याच मुद्याला धरून त्यांनी गाण्यात याची सर्व उन्हाची स्थिती सांगतली आहे. तसेच या दिवसांमध्ये ऊसाचा रस पिणंही तितकंच महत्वाचं असल्याचं सांगितलं आहे.

हा व्हिडीओ यू ट्युबवर या चॅनलवर 23 एप्रिल 2021 रोजी पोस्ट करण्यात आला आहे. पोस्ट करताना ‘#1 despito- Marathi version. sugarcane juice song . (उसाचा रस) song Marathi song’ असं कॅप्शन टाकलं आहे. तसेच

हा गाण्याचा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ लोकांनी पाहिलं आहे. तसेच या व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव पडत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

https://www.youtube.com/watch?v=KO-zL81rdzo&t=76s

महत्वाच्या बातम्या-

कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्यांची सलमान खान अशाप्रकारे…

काय सांगता! चक्क पक्ष्यांनी करून दाखवला हवेत भन्नाट स्टंट,…

अंतराळातून पृथ्वी नेमकी कशी दिसते?, जाणून घेण्यासाठी पाहा…

‘अक्षयवर 500 कोटी लावतील पण माझ्यावर…..’,…

याआधी तुम्ही फुलपाखराचं ऑपरेशन पाहिलंत का?, नसेल पाहिलं तर…