मुंबई | 26 नोव्हेंबर 2008 मुंबईसाठी काळा दिवस ठरला. अजमल कसाबसह इतर नऊ दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 8 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्याचबरोबर अजमल कसाबला पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून जिवंत पकडलं होतं.
मुंबईत दोन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून ट्रेनिंग दिल्याचं सिद्ध झालं होतं. मात्र, पाकिस्तानने कधीही याची कबुली दिली नव्हती. अशातच आता पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोठं वक्तव्य केलंय. बोलत असताना त्यांनी मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यावर भाष्य केलं.
भारताला कसाबचा पत्ता माहित नसल्याचं रशीद अहमद यांनी सांगितलं. पण पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी कसाबचा पत्ता भारताला दिला, असा दावा रशीद अहमद यांनी केला आहे.
अजमलच्या फरीदकोटमधील घराची माहिती भारताला नव्हती, पण नवाज शरीफ ती माहिती सांगितली. माझं म्हणणं चुकीचं सिद्ध झालं तर चोराची शिक्षा हीच माझी शिक्षा, असंही रशीद म्हणाले आहेत.
इतकंच नाही तर नवाझ शरीफ सद्दाम हुसेन, मुअम्मर अल-गद्दाफी आणि ओसामा बिन लादेन यांसारख्या दहशतवाद्यांकडून शरिफ पैसे घेत होते, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या गृहमंत्र्याने हा खुलासा केल्याने आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचावर आता तोंड लपवून फिरावं लागणार हे मात्र नक्की.
महत्त्वाच्या बातम्या –
“2 वर्षात तब्बल 19 लाख EVM गायब”, शशी थरूर यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Russia-Ukrain War: “युक्रेनला सांगा मी त्यांना पुर्णपणे बर्बाद करेन”; पुतिनच्या धमकीनं जग हादरलं
मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात
“संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”