“2 वर्षात तब्बल 19 लाख EVM गायब”, शशी थरूर यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

नवी दिल्ली | देशाची लोकशाही ही निवडणुकीच्या प्रक्रियेवर चालत आहे. निवडणुका सदोष पद्धतीने पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग काम करत असते.

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ईव्हीएमद्वारे मतदान करण्याच्या प्रक्रियेवर देखील वाद आहे.

काही दिवसांपूर्वीच कर्नाटक उच्च न्यायालयानं 2016-2018 दरम्यान ईव्हीएम (EVM) मशीन गायब होण्याचा गंभीर मुद्दा निवडणूक आयोगाच्या समोर उपस्थित केला होता.

उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर आता काॅंग्रेस नेते शशी थरूर यांनी ईव्हीएम मशीनवरून निवडणूक आयोगाला आरोपाच्या पिंजऱ्यात उभा केलं आहे.

कर्नाटक विधिमंडळात काॅंग्रेसचे आमदार एचके पाटील यांनी ईव्हीएमच्या गायब होण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर या वादाला सुरूवात झाली.

2016-2018 दरम्यान तब्बल 19 लाख ईव्हीएम मशीन्स गायब झाल्याचं प्रकरण आरटीआयमधून उघडकीस आलं होतं. त्यानंतर बराच गोंधळ देखील झाला.

सध्यातरी मी सर्वांपासून लांब आहे पण ईव्हीएमबाबत जे वाचण्यात आणि ऐकण्यात येत आहे त्यावरून ही गोष्ट चिंता करण्यासारखी आहे. निवडणूक आयोगानं यावर स्पष्टीकरण द्यावं, असं थरूर म्हणाले आहेत.

गायब झालेल्या ईव्हीएम कोणाकडे आहेत आणि त्याचा वापर कशासाठी करण्यात येत आहे. हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, असंही थरूर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Russia-Ukrain War: “युक्रेनला सांगा मी त्यांना पुर्णपणे बर्बाद करेन”; पुतिनच्या धमकीनं जग हादरलं

  मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

  नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

  “संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”

  “भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण…”