हा पोपट चक्क कुत्र्याच्या प्रेमात वेडा झालाय! पाहा प्रपोज करतानाचा व्हिडीओ

नवी दिल्ली | पाळीव प्राण्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर सतत पाहायला मिळत असतात. मग यामध्ये आपल्या मालकासाठी गाडीमागे धावणारा कुत्रा असेल किंवा डांस करणारे मांजर असेल, असे प्राणी नेहमीच नेटकऱ्यांची वाह वाह मिळवून जातात.

जगभरात अनेक पाळीव प्राणी प्रेमी आहेत. काहींनी तर आपल्या प्राण्यांच्या नावाच्या सोशल मिडियावर प्रोफाईल्स देखील उघडल्या आहेत. आपल्या प्राण्याने काय गमती जमती केल्या, याचे व्हिडीओ हे पाळीव प्राणी प्रेमी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

सध्या इंटरनेटवर असाच एका पांढऱ्या पोपटाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हा पांढरा पोपट माणसासारखा बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्यच वाटेल.

विंडी मारी नावाची फॉरेनर महिला एक प्रसिद्ध नेटिझन आहे. ती सतत सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ शेअर करत असते. विंडी मारीने शेअर केलेले पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असतात.

विंडीने नुकताच शेअर केलेला पोपटाचा व्हिडीओ देखील तूफान व्हायरल होत आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विंडी आपला पांढरा पोपट स्वीट पी याची आपल्या घरातील छोट्या काळ्या रंगाचा कुत्र्याशी ओळख करून देत आहे.

यावेळी हा पोपट विंडीच्या मांडीवर असणाऱ्या छोट्या कुत्र्याच्या पिलाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो. यानंतर विंडीच्या संगण्यावरून हा पोपट कुत्र्याच्या छोट्या पिलाला ‘आय लव्ह यु’ असं बोलतो. हा व्हिडीओ विंडीने शेअर केल्यानंतर नेटकरी यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, एकाने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं की, मी आत्तापर्यंत पाहिलेल्या गोड व्हिडीओपैकी हा एक व्हिडिओ आहे. प्रत्येक प्राणिमात्राला प्रेमाची आणि एकत्र राहण्याची गरज असते, हे या व्हिडीओतून दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा”

मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्ड परीक्षेस बसता न येणाऱ्या…

‘देव तारी त्याला कोण मारी’; 12व्या मजल्यावरून…

जाणून घ्या! उन्हाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने…

वनअधिकारी दीपाली चव्हाण यांची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये…