‘या’ देशात सोन्याचा डोंगर सापडला अन् सोनं लुटण्यासाठी एकंच झुंबड उडाली; पाहा व्हिडीओ

काँगो | अलीकडे जगभरात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. मात्र, अशा परिस्थितीत जर आपल्याला एखाद्या सोन्याच्या डोंगराविषयी माहिती मिळाली तर? आपणही कोणताच विचार न करता तो डोंगर पोखरू लागू.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आफ्रिकेतील काँगोमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे. येथील लोकांना गोल्ड माउंटची माहिती मिळताच त्यांनी त्या डोंगरावर तुफान गर्दी केली आहे.

आफ्रिकेतील या डोंगरात 60 ते 90 टक्क्यांपर्यंत सोनं असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली होती. बघता बघता ही बातमी आफ्रिकेत झपाट्याने पसरली. यानंतर आसपासचे ग्रामस्थ त्या डोंगराजवळ जमू लागले.

हे ग्रामस्थ आपल्यासोबत खोदण्याचे साहित्य पिशव्या इत्यादी गोष्टी घेऊन त्या डोंगरावर गेले आणि तिथे खोदकाम करून सोनं काढू लागले. सोनं जमवण्यासाठी स्थानिकांनी त्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

याचाच व्हिडीओ काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता आणि सध्या तो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. सोन्याची लूट करण्यासाठी डोंगरावर लोकांची गर्दी जमल्यानंतर तिथे तातडीने बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, या व्हिडीओवर नेटकरी अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच डोंगरावरील सोनं मिळवू शकणाऱ्या लोकांना नशीबवान समजत आहेत. अद्याप या डोंगरावर नेमकं किती सोनं आहे, याची माहिती समोर आली नाही.

महत्वाच्या बातम्या-

हा पोपट चक्क कुत्र्याच्या प्रेमात वेडा झालाय! पाहा प्रपोज करतानाचा व्हिडीओ

“पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा”

मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्ड परीक्षेस बसता न येणाऱ्या…

‘देव तारी त्याला कोण मारी’; 12व्या मजल्यावरून…

जाणून घ्या! उन्हाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने…