‘दबंग’ खानच्या कुटुंबातील ‘ही’ व्यक्ती लकवरच करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई| बाॅलिवूडमध्ये स्टार किड्स आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण करत असतात. यात काही आता नवीन गोष्ट राहिली नाही. आता या यादीमध्ये आणखी एका नव्या स्टारकिड्ची भर पडली आहे. ती म्हणजे बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची भाची अलीजे अग्नीहोत्री.

दबंग सलमान खानची भाची अलीजे अग्निहोत्री लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. अलीजे अग्निहोत्री ही अलविरा खान आणि अभिनेता- निर्माता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.

या चित्रपटात सनी देओल यांचा मुलगा राजवीर देओल हा अलीजेसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अनेक कलाकार असणार आहेत. हा चित्रपट रोमॅन्टिक-कॉमेडी असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजश्री प्रॉडक्शनचे सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश करणार आहे. अवनीश या चित्रपटातून चित्रीकरणात एण्ट्री करणार आहे. त्यामुळे या एका चित्रपटातून दोन स्टारकिड्सची बॉलिवूडमध्ये एण्ट्री होण्याची शक्यता आहे. अद्याप याविषयी कुठलीही अधिकृत माहिती दिली गेलेली नाही.

विशेष म्हणजे यापूर्वीही अलीजे अग्निहोत्रीच्या पदार्पणाच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी जावेद जाफरीचा मुलगा मीझान जाफरीसोबत ती पडद्यावर दिसणार असल्याच्या चर्चा होत्या. शेवटी त्या चर्चाच राहील्या.

दरम्यान, सलमान खान इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचा गॉडफादर आहे. सलमानने मेव्हणा आयुष शर्माला ‘लव्हरात्री’ चित्रपटातून लाँच केलं. त्यानंतर मित्र इक्बाल रत्नासी यांचा मुलगा झहीरलाही बॉलिवूडमध्ये आणणार आहे. त्यापाठोपाठ बॉडीगार्ड शेराचा मुलगा टायगरचं लाँचिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या –  

जमिनीवर बसलेल्या बाळाला माकडानं घेतलं कुशीत…

“एखाद्याला बदनाम करण्याची फडणवीसांची जुनीच पद्धत…

अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली…

औरंगाबादच्या ‘या’ रुग्णालयात कोरोना रुग्णांचे…

मुंबईतील 60 वर्षे जुन्या ‘या’ वडापावची जोरदार…