देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेला सुरुंग थांबवण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांचे मोदी सरकारला तीन महत्वाचे सल्ले

नवी दिल्ली | कोरोनाकाळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील उद्योगधंदे काही काळासाठी बंद होते. देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा चांगलाच फटका बसला आहे. देशाची अडचणीत आलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला काही महत्वाचे सल्ले दिले आहेत.

देशातील सामान्य नागरिकांच्या रोजगार आणि आर्थिक क्षमतेवर कोरोनाचा चांगलाच प्रभाव पडला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने बाजारात पैसे गुंतवत अनेक उद्योगधंद्यांना मदत केली आहे. मात्र, देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारने अजून मोठी पाऊलं उचलण्याची गरज आहे, असं डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

सरकारने क्रेडीट हमी कायद्यांतर्गत व्यापार आणि उद्योगांना पुरेशी रक्कम उपलब्ध करून द्यावी. सरकारने लोकांचा रोजगार सुरक्षित राहील याची व्यवस्था करण्याबरोबरच, लोकांना प्रत्यक्ष आर्थिक मदत करून त्यांची खर्च करण्याची क्षमता कायम राखावी. तसेच सरकारने फायनान्शियल सेक्टरमध्ये संस्थागत स्वायत्तता आणि प्रक्रियांतर्गत सुधारणा केली पाहिजे, असे तीन उपाय मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला सुचवले आहेत.

दरम्यान, देशात कोरोनाकाळात अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत. त्याबरोबरच, उपसमारीसारख्या संकटांमुळे आत्महत्या केल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पाऊल उचलणं गरजेचं बनलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊत खोटारडे! उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरून संजय राऊत खोटं बोलत आहेत; मामाचा खुलासा

“सुशांतसिंग राजपूतचा त्याच्याच कुत्र्याच्या बेल्टने गळा दाबून खून”

“जेव्हा जेव्हा देश भावुक झाला, तेव्हा तेव्हा महत्त्वाच्या फाईल्स गायब झाल्या”

मृत कोरोनाग्रस्ताला कुटुंबाने वाऱ्यावर सोडलं; तृतीयपंथियांसह-नागरिकांनी घालून दिला आदर्श

दिशा सॅलियन आणि सुशांतचं नातं काय?; मुंबई पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा