…म्हणून अरविंद केजरीवाल घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!; भेटीकडे साऱ्यांचं लक्ष

नवी दिल्ली |  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते संसद परिसरात मोदींची भेट घेणार असल्याची माहिती कळतीये.

दिल्लीत गेल्या एक महिन्यांपासून हिंसाचार सुरू होता. अनेक भागात जाळपोळीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे दिल्लीचं वातावरण गेल्या एक महिन्यापासून अत्यंत खराब आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर असताना विशेषत: दिल्लीत असताना राजधानीत आगडोंब उसळला होता. यावरून केंद्र सरकारवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडत आरोप केले होते. केंद्र सरकारनेही दिल्ली हिंचासाराची गंभीर दखल घेत दिल्ली कशी आटोक्यात येईल, यासाठी प्रशासनाला आदेश दिले. याच सगळ्या बाबींवर आज केजरीवाल-मोदी यांच्यात चर्चा होऊ शकते, असं कळतंय.

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी रात्री आश्चर्यकारक ट्वीट करत सगळ्यांना धक्का दिला आहे. मी माझे सगळे सोशल मीडिया अकाऊंटस डिअॅक्टिव करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी ट्वीट करून सांगितलं आहे. मोदींच्या ट्वीटनंतर चर्चांना उधाण आलं आहे. मोदींनी असं ट्वीट का केलं असावं, याचं कोडं अद्याप उलगडलेलं नाहीये. त्यातच केजरीवाल आज मोदींची भेट घेणार आहेत.

दरम्यान, दिल्ली विधानसभेतल्या घवघवीत यशानंतर केजरीवाल आज दुसऱ्यांदा मोदींची भेट घेणार आहे. आज त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होते, याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

-नातू हवा म्हणून सूनेचा छळ; राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

-पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ ट्वीटनंतर नेटकरी भावूक; हजारो लोक म्हणाले #NoSir

-मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या विचारावर मिसेस फडणवीसांचं ट्वीट; म्हणतात…

-राहुल गांधींनी मोदींना दिलेला सल्ला भाजपला झोंबला; ट्वीट करत चढवला हल्ला

-“जीडीपी घसरायला लागला की लागले टीआरपी स्टंट करायला”