मुस्लिम आरक्षणावर विश्व हिंदू परिषदेने डोळे वटारताच सेनेचा वाघ शांत!

मुंबई |  मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत ठाकरे सरकार कायदा करणार आहे. ठाकरे सरकारच्या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. भाजप आणि अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावरून विश्व हिंदू परिषदेने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर मात्र शिवसेनेने आमची अशी काहीच चर्चा झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने डोळे वटारताच सेनेचा वाघ शांत झाला का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

ठाकरे सरकार मुस्लिम समाजाला धर्मावर आधारित आरक्षण देण्याचा विचार करतंय, ही बातमी चिंताजनक आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखालच्या सरकारने मुस्लिमांचं लांगुलचालन करता कामा नये. हिंदू समाजाच्या शिवसेनेकडून या अपेक्षा नाहीयेत, असं ट्वीट करून विश्व हिंदू परिषदेने शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यांच्या ट्वीटला उत्तर देताना शिवसेना कम्युनिकेशन या ट्वीटर हँडलवरून आमच्यामध्ये (शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी) तशी काही चर्चा झाली नाही, असं ट्वीट करत कोलांटउडी घेतली आहे.

मुस्लीम आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने जे मान्य केलं आहे ते लक्षात घेऊन राज्यात लवकरात लवकर मुस्लीम आरक्षण देण्याबाबत अध्यादेश काढून कायदा करु आणि निर्णय घेऊ, असं ठाकरे सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

दुसरीकडे सरकारच्या निर्णयावर भाजपने मात्र जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सरकार बनवताना शिवसेनेनं आपली विचारधारा सोडून काय काय मॅनेज केलंय याची माहिती द्यायला हवी. अशा प्रकारच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणही धोक्यात येऊ शकतं, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, शिवसेना खरंच मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा देणार की हिंदुत्ववादी संघटनांचे आक्षेप लक्षात घेता मावळ भूमिका घेणार, हे पहणे येत्या काळात महत्त्वाचं राहिल.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून अरविंद केजरीवाल घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!; भेटीकडे साऱ्यांचं लक्ष

-नातू हवा म्हणून सूनेचा छळ; राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

-पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ ट्वीटनंतर नेटकरी भावूक; हजारो लोक म्हणाले #NoSir

-मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या विचारावर मिसेस फडणवीसांचं ट्वीट; म्हणतात…

-राहुल गांधींनी मोदींना दिलेला सल्ला भाजपला झोंबला; ट्वीट करत चढवला हल्ला