कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात; सलामीला कोण?

नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचा सामना वेस्ट इंडिजसोबत अँटिग्वा येथे खेळवण्यात येणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील विजयासह भारत आपले जागतिक कसोटी क्रमवारीतील स्थान भक्कम करेल. ही मलिका दोन कसोटी सामन्यांची असणार आहे. याआधी झालेल्या सराव सामन्यात भारताने वर्चस्व राखले. चेतेश्वर पुजाराने सराव सामन्यात शतक केले. त्याबरोबरच रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतके पूर्ण केेलीत.

या सामन्यात भारताच्या सलामीच्या जोडीसाठी तीन पर्याय असतील. सलामीच्या फलंदाजीतील समन्वय ही भारतीय संघाची प्रमुख डोकेदुखी झाली आहे. मयांक अगरवाल निश्चित असला तरी दुसऱ्या स्थानाचा प्रश्न कायम आहे. विशेष सलामीवीर लोकेश राहुलचे पारडे जड असले तरी हनुमा विहारीचा भक्कम पर्याय उपलब्ध आहे.

हार्दिक पंड्या या सामन्यासाठी उपलब्ध असल्यास अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्यापैकी एक जण संघाबाहेर जाईल. परंतु गेल्या काही वर्षांतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकांचा आढावा घेतल्यास भारतीय संघ अतिरिक्त फलंदाजासह खेळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अजिंक्य आणि रोहित या दोघांनाही संघात स्थान मिळू शकेल.

खेळपट्टी वेगवान आणि उसळणारी असेल, तर भारतीय संघ चार विशेषज्ञ गोलंदाजांसह खेळेल. जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्याकडे वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. 5 गोलंदाज खेळणार असतील तर फिरकी गोलंदाजाच्या स्थानासाठी रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांच्यात तीव्र स्पर्धा असेल.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा ऋषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक).

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रकहीम कोर्नवॉल, शेन डॉवरिच, शेनॉन गॅब्रिएल, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, कीमो पॉल, केमार रोच.

महत्वाच्या बातम्या-

-औरंगाबादमध्ये काँग्रेसला धक्का; विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे अंबादास दानवे विजयी!

-राज ठाकरे कुटुंबासह ईडी कार्यालयाकडे रवाना

-गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचं बाळा नांदगावकरांना आवाहन

-मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

-राज ठाकरेंची आज ईडीकडून चौकशी; संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त