उद्धव ठाकरे आज करणार रामजन्मभूमीत प्रवेश; असा असणार अयोध्या दौरा

मुंबई| शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्येत राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा तिसरा अयोध्या दौरा आहे.

या आधी जेव्हा उद्धव ठाकरे अयोध्येत, श्री राम जन्मभूमीच्या दर्शानाला आले होते. तेव्हा त्यांच्या दौऱ्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती. आज होणाऱ्या शिवसेनेच्या दौऱ्यावर मात्र, कोरोना व्हायरसचं सावट स्पष्टपणे दिसून येतंय. कारण, शिवसेनेची नियोजित शरयु नदी महाआरती रद्द करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाल्यावर त्यांची पत्रकार परीषद होणार आहे. त्यानंतर ते राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखिल उपस्थित असणार आहेत.

मुंबई आणि ठाण्याहून हजारोंच्चा संख्येने शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेत. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमुळे शिवसेनेनं त्यांचं आक्रमक हिंदु्त्त्व मवाळ केल्याचेही आरोप विरोधकांडून केले जात होते. या सर्व आरोपांना शिवसेना आज कृतीतून उत्तर देणार असल्याचं सांगितलं जातंय.

महत्वाच्या बातम्या-

-नाथाभाऊंची नाराजी दूर करण्यासाठी भाजप घेणार ‘हा’ मोठा निर्णय

-अखेर ग्रामपंचायत सदस्यामधूनच होणार सरपंचाची निवड; राज्यपालांनी केली स्वाक्षरी

सिनेविश्वातला जातीयवाद आताचा नाही… त्यासाठी काही माणसं कार्यरत- विक्रम गोखले

-“अमृता फडणवीस एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून बोलतीये हे महाराष्ट्राने स्विकारायला हवं”

-मी बोलते ‘ते’ मीच बोलते….. ना की देवेंद्र फडणवीसांची बायको म्हणून- अमृता फडणवीस