नाथाभाऊंची नाराजी दूर करण्यासाठी भाजप घेणार ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे. कारण भाजप खडसे यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खडसे यांच्यासोबत रीपाईचे रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांनाही राज्यसभेत संधी मिळण्याची शक्यता आहे.

सुरुवातीला मंत्रीपदाला सोडचिठ्ठी आणि त्यानंतर विधानसभेला उमेदवारी नाकारली गेल्यानंतर खडसे यांच्यातील खदखद वाढत होते. राज्यातील पक्ष नेतृत्वावर तोंडसूख घेत त्यांनी आपली खदखद व्यक्त केली होती. मात्र, राज्यसभेत संधी मिळाली तर खडसेंचा राग शांत होण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसे हे भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची नाराजी जास्त काळ ओढवून घेणं पक्षाला जमणार नाही. शिवाय पक्षातील इतर नेत्यांमध्येही नाराजी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खडसेंना राज्यसभेवर पाठवून महत्वाच्या नेत्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, खडसे यांच्यासोबत रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांची राज्यसभेतील उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अखेर ग्रामपंचायत सदस्यामधूनच होणार सरपंचाची निवड; राज्यपालांनी केली स्वाक्षरी

सिनेविश्वातला जातीयवाद आताचा नाही… त्यासाठी काही माणसं कार्यरत- विक्रम गोखले

-“अमृता फडणवीस एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून बोलतीये हे महाराष्ट्राने स्विकारायला हवं”

-मी बोलते ‘ते’ मीच बोलते….. ना की देवेंद्र फडणवीसांची बायको म्हणून- अमृता फडणवीस

-ट्रोलिंग झालं की मला रणांगणावर असल्यासारखं वाटतं- अमृता फडणवीस