“बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांना विश्वासात घेऊनच काम होतंय”

मुंबई | राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या नाराजीबाबत प्रश्व विचारला असता त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना विश्वासात घेऊनच काम होत आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

काँग्रेसकडे दुर्लक्ष नाही. आघाडी सरकारची एक छोटी कोअर कमिटी आहे. या कमिटीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी दोन ज्येष्ठ नेते आहेत. या सर्व नेत्यांच्या कोअर कमिटीची बैठक होते. ही कोअर कमिटी एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेते, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, लोक डॉक्टरला देव मानतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्वांनी संवेदनशीलतेने काम करणं जरुरीचं आहे, असंही राजेश टोपेंनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद, त्या पदाचा मान राखून बोललं पाहिजे- देवेंद्र फडणवीस

-‘हवा तेज चल रही है उद्धवराव… खुर्सी संभालो’; ‘या’ भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

-…तर कोरोना चाचणी करण्याची गरज नाही- राजेश टोपे

-‘सरकारचे संकटमोचन संजय राऊत तुम्हीच धावून या’; आशिष शेलारांचा राऊतांना टोला

-भारतानं अमेरिकेला साथ दिली तर…; चीनची भारताला धमकी