राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद, त्या पदाचा मान राखून बोललं पाहिजे- देवेंद्र फडणवीस

मुंबई | अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्यायच्या की नाही हा मोठा गोंधळ राज्यात निर्माण झाला असून राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये यावरुन वाद सुरु आहे. आता या वादावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद आहे. त्या पदाचा मान राखूनच सर्वांनी बोललं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर असून दापोलीत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

परीक्षा घ्यायच्या की नाही यासंदर्भात राज्य सरकारनेच स्वत: कुलगुरुंची कमिटी तयार केली. त्या कमिटीने सांगितलं की, परीक्षा घेतल्या पाहिजे. कशा घ्यायच्या हेदेखील सांगितलं. या सर्व व्यवस्थेचे मुख्य कुलपती म्हणजेच राज्यपाल आहेत. त्यांच्याशिवाय निर्णय घेतला जाऊ शकत नाही. तरीही मंत्र्यांनी परीक्षा घेणार नाही जाहीर केलं, असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, कायद्याने राज्यपाल आणि व्यवस्थेला अधिकार दिले आहेत. मंत्र्यांना यासंदर्भातले अधिकार नाहीत. मंत्री इतके दिवस विद्यापीठाच्या कारभारात लक्ष घालत नव्हते. आता ते का लक्ष घालत आहेत हा प्रश्न पडला आहे, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘हवा तेज चल रही है उद्धवराव… खुर्सी संभालो’; ‘या’ भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

-…तर कोरोना चाचणी करण्याची गरज नाही- राजेश टोपे

-‘सरकारचे संकटमोचन संजय राऊत तुम्हीच धावून या’; आशिष शेलारांचा राऊतांना टोला

-भारतानं अमेरिकेला साथ दिली तर…; चीनची भारताला धमकी

-सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण शांत बसून कसं राहणार?- चंद्रकांत पाटील