“सुप्रियाताई सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात हे मी सिद्ध करु शकतो”

मुंबई | राज्यातील सुपर मार्केटमध्ये आणि किराणा दुकानांमध्ये वाईनची विक्री करण्यास ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाने परवानगी दिली आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतला असल्याचं सरकार सांगतंय.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे. अशातच आता भाजपने या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

अशातच मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारे कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी वाईन धोरणाविरोधात बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता चांगलाच वाद पेटल्याचं पहायला मिळतंय.

बंडातात्या कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आणि पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्य वक्तव्य केलं आहे.

‘पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारू पितात,’ असा दावा करत कराडकर यांनी करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा आता सर्वच पक्षांनी निषेध व्यक्त केलाय.

बंडातात्यांच्या या वक्तव्यानंतर आता चांगलाच वाद पेटल्याचं पाहता त्यांनी या वक्तव्यावर माफी देखील मागितली आहे. आपण माफी मागायला तयार आहोत, पण आता हा विषय संपवा, असं बंडातात्या म्हणाले आहेत.

दरम्यान, बंडातात्यांनी माफी मागितल्यानंतर आता हा विषय आणखी पेटणार आहे की शांत होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

टेन्शन संपलं! WhatsApp वापरकर्त्यांना लवकरच मिळणार ‘ही’ खास सुविधा

 शर्यतीदरम्यान बैलगाडी थेट लोकांच्या गराड्यात घुसली अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

 धक्कादायक! लसीकरणानंतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

आता सुट्टी नाय, होत्याचं नव्हतं करीन पण…- किरण माने