वेस्ट इंडिजचं नवं वादळ! ‘या’ कॅरेबियन खेळाडूनं गोलंदाजांना धु-धु धुतलं

मुंबई | एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा (West Indies) संघ भारतात दाखल झाला आहे. कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखालील संघ भारताला घरच्या मैदानावर पराभूत करण्याच्या इराद्याने आला आहे.

अशातच विंडीज संघात काही महान खेळाडू आहेत, परंतु काही विध्वंसक खेळाडू आहेत जे यावेळी संघाचा भाग होऊ शकले नाहीत. हे खेळाडू सध्या पाकिस्तान आणि बांगलादेशच्या T20 लीगमध्ये खेळत आहेत.

असाच एक खेळाडू म्हणजे आंद्रे फ्लेचर याने बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये आपल्या बॅटची धार दाखवून गोलंदाजांना धूळ चारली आहे. फ्लेचरच्या वादळी खेळीच्या जोरावर खुलना टायगर्सने सिलहट सनरायझर्सचा 9 गडी राखून पराभव केला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या सिलहट सनरायझर्सच्या संघाला केवळ 142 धावा करता आल्याने हा सामना फारसा रोमांचक होणार नाही, असं वाटत होतं.

तिसरा क्रमांकाचा फलंदाज मोहम्मद मिथुनने संघाला या धावसंख्ये पर्यंत नेण्याची जबाबदारी एकहाती घेतल्याचं पहायला मिळालं होतं. आता काम सोपं झालं होतं.

खुलना टायगर्ससमोर लक्ष्य फार मोठं नव्हतं आणि संघाच्या फलंदाजांनी ते आणखी सोपं केलं. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आंद्रे फ्लेचरने खुलना टायगर्ससाठी सलामीला आला आणि तो येताच धावांचे वादळ निर्माण केलं.

फ्लेचरने सलामीवीर सौम्या सरकारच्या साथीने पहिल्या 11 षटकांत 99 धावा देत संघाचा विजय निश्चित केला होता. या कॅरेबियन फलंदाजाने अवघ्या 47 चेंडूत 71 धावा करत संघाला 14.2 षटकात 9 विकेट्स राखून सहज विजय मिळवून दिला.

दरम्यान, आपल्या खेळीदरम्यान फ्लेचरने केवळ 10 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या. आंद्रे फ्लेचरच्या या पारीमुळे आता वेस्ट इंडिजमध्ये नवं वादळ आलंय, असं म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

टेन्शन संपलं! WhatsApp वापरकर्त्यांना लवकरच मिळणार ‘ही’ खास सुविधा

 शर्यतीदरम्यान बैलगाडी थेट लोकांच्या गराड्यात घुसली अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

 धक्कादायक! लसीकरणानंतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

आता सुट्टी नाय, होत्याचं नव्हतं करीन पण…- किरण माने

 मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती समोर