नवरा मध्यरात्री उठून असं काही करायचा की…; बायकोला तर धक्काच बसला

नवी दिल्ली | लग्नानंतर नवरा आणि बायकोचं नातं हे गुलाबाच्या नाजूक फुलासारखं असतं असं मानलं जातं. प्रत्येकाची आवड वेगळी असते. आपल्या पाहिजे असा लाईफ पार्टनर मिळवण्याचा अनेकजण प्रयत्न करतात.

प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या वेगवेगळ्या सवयी असतात, ज्या कधीकधी समोरच्या लोकांना खूप विचित्र वाटतात. अनेक वेळा या सवयींमुळे समोरच्या व्यक्तीलाही खूप त्रास सहन लागतो.

नुकतंच असंच एक प्रकरण समोर आलं आहे. ही घटना आहे एका महिलेची, जिथं ती तिच्या पतीच्या एका सवयीमुळे खूप त्रासली आहे. त्यामुळे तिच्या रिलेशनशीपवर मोठा परिणाम होताना दिसत आहे.

माझा नवरा बाकीच्यांपेक्षा खूप वेगळा आहे आणि म्हणूनच मी त्याच्याशी लग्न केलं. पण अलीकडे त्याला एक विचित्र सवय लागली आहे. तो दोन टप्प्यांत झोपतो, अशी कहानी बायकोनं सांगितली आहे.

नवरा रात्री लवकर झोपतो. पहिल्यांदा चार ते पाच तास झोप घेतल्यानंतर नवरा झोपेतून उठून काहीतरी आगळ्या वेगळ्या गोष्टी करतो. तो रनिंगला जातो. कधी स्वयंमपाक करतो तर कधी त्याला सेक्स करण्याचा मुड होतो.

त्यानंतर दोन तासाच्या गॅपनंतर तो पुन्हा बेडवर जाऊन झोपतो. त्याच्या या सवयीमुळे आमच्या सेक्स लाईफवर परिणाम झाला आहे, अशी व्यथा महिलेने मांडली आहे. त्याच्या या मध्यरात्री उठून वेगवेगळ्या गोष्टींमुळे माझी नीटशी झोप होत नाही, असंही ती म्हणते.

दरम्यान, नवऱ्याच्या या सवयीवर महिलेने तिने पोर्टलवर तज्ज्ञांना सल्ला मागितला आहे. त्यावेळी नवऱ्याशी चर्चा करून त्याला तुला होत असलेल्या त्रासाबद्दल सांग असं तज्ज्ञांनी उपाय सुचवला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

ऐकलं का??? देशाच्या अर्थमंत्री म्हणतात, “भारतात खूप काही महागाई नाही”

पाकिस्तानी खासदाराने सभागृहात कुर्ता वर करून केलं असं काही की…; व्हिडीओ तुफान व्हायरल

Devon Conway च्या प्री-वेडिंग पार्टीत चेन्नईच्या खेळाडूंचा लुंगी डान्स; पाहा व्हिडीओ

कीर्तनकार सेक्स व्हिडीओ प्रकरणात अखेर पोलिसांची मोठी कारवाई!

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! सामना सुरू होण्याआधीच वाईट बातमी आली