पिंपरी-चिंचवडचे डाॅशिंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली!

पुणे | राज्य पोलीस दलातील एक सिंघम स्टाईल अधिकारी म्हणून पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना ओळखण्यात येतं. अशातच आता कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे कृष्ण प्रकाश आणि नाशिकचे आयुक्त दिपक पांडे याचे नाव आहे.

कृष्ण प्रकाश यांची राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे. तर अंकुश शिंदे पिंपरी चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत.

दीड वर्षापूर्वीच कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी करण्यात आली होती. त्यानंतर आपल्या आक्रमक अंदाजात त्यांनी पिंपरीत कामाला सुरूवात केली.

दीड वर्षात कृष्ण प्रकाश आपल्या निडर स्वभावामुळे पिंपरी चिंचवडच्या लोकांना भावले. अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या त्यांनी आवळल्या होत्या. कृष्ण प्रकाश यांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक देखील सार्वजनिकरित्या जाहीर केला होता.

जानेवारी महिन्यात एका खून प्रकरणातील आरोपीला पकडताना त्यांनी झाड फेकून मारल्याचा दावा देखील करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची चर्चा राज्यभर झाली होती.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या- 

नवरा मध्यरात्री उठून असं काही करायचा की…; बायकोला तर धक्काच बसला

ऐकलं का??? देशाच्या अर्थमंत्री म्हणतात, “भारतात खूप काही महागाई नाही”

पाकिस्तानी खासदाराने सभागृहात कुर्ता वर करून केलं असं काही की…; व्हिडीओ तुफान व्हायरल

Devon Conway च्या प्री-वेडिंग पार्टीत चेन्नईच्या खेळाडूंचा लुंगी डान्स; पाहा व्हिडीओ

कीर्तनकार सेक्स व्हिडीओ प्रकरणात अखेर पोलिसांची मोठी कारवाई!