इंदोरीकरांना कोर्टात खेचल्याशिवाय मी गप्प बसणार नाही- तृप्ती देसाई

अहमदनगर | इंदोरीकर महाराजांच्या चाहत्यांनी आणि भक्तांनी माझं जे चारित्र्यहनन केलं आहे, माझी बदनामी केलीये, त्याबद्दल मी त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी घेतला आहे.

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी जरी मागितली असली तरी त्यांना उशीराने जाग आलीये. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, या मागणीवर तृप्ती देसाई ठाम असल्याचं पाहायला मिळत आहेत.

कुणी कितीही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल हा होणारच. त्यासाठी मी स्वत: फिर्यादी होणार असल्याचं देसाई यांनी सांगितलंय.. महिलांबाबत जर कुणी असं वक्तव्य करत असेल तर मला पाहायचंय महाराष्ट्राचे गृहमंत्री महिलांच्या बाजूने आहेत की महाराजांच्या बाजूने आहेत, असंही देसाई म्हणाल्या आहेत.

दुसीरकडे इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दिलगीरी व्यक्त केली आहे. माझ्या अभ्यासानुसार मी जे काही बोललो त्याचा मीडियाने विपर्यास केला आहे. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं महाराजांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोरेगाव-भीमा मध्ये अनावश्यक वातावरण निर्मिती करण्याला संभाजी भिडेच कारणीभूत- शरद पवार

-“मीडियाने माझ्या बोलण्याचा विपर्यास केला… मनं दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो”

-“मीडियाने माझ्या बोलण्याचा विपर्यास केला… मनं दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो”

-8 दिवसांनंतर अखेर इंदोरीकर महाराजांनी नमतं घेतलं….!

-तुकाराम महाराजांचे वंशज म्हणतात, ‘इंदोरीकरांमुळे कीर्तनाचा दर्जा घसरतोय!’