इंदुरीकरांच्या सांगण्यावरुन मला अनेकांनी धमक्या दिल्या- तृप्ती देसाई

पुणे | प्रसिद्ध कीर्तनाकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकरांविरोधात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आज अहमदनगरमध्ये जाऊन तक्रार दाखल जाणार असल्याचं देसाईंनी सांगितलं आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार म्हणून माझ्यावर हल्ला करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे.

तुमच्यावर प्राणघातक हल्ला करणार आहे. रोडवरुन येताना तुमच्यावर अ‌ॅसिडचे हल्ले होणार आहेत. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालीय अशा धमक्या मला दिल्या जात आहेत. याबाबतही सायबरने गुन्हा नोंदवावा, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. महिलांचा अपमान आम्ही सहन करत नाही. हिंदू धर्म वारकरी संप्रदाय याविषयी आदरच आहे. पण जेव्हा एखादे महाराज कीर्तनातून प्रबोधन करतात. माझ्यावर गेल्या काही दिवसांपासून चारित्र्य हनन आणि अश्लील टीका होत आहेत. हेच महाराजांचं प्रबोधन आहे का?, इंदुरीकरांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर टीका केली जातेय, असा आरोपही देसाईंनी यावेळी केला आहे.

दरम्यान, पुत्रप्राप्तीसाठी ऑड इव्हनचा फॉर्म्युला सांगणाऱ्या इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याचंही तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-इंदुरीकर महाराज संतापले… म्हणाले आता तरी बंद करा रे!!

-इंदुरीकर महाराजांविरोधात अखेर तृप्ती देसाईंनी उचललं मोठं पाऊल!

-“इंदुरीकरांच्या कीर्तनात कीर्तन कमी आणि तमाशाच जास्त असतो”

-अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकणार लग्नबंधनात?

-‘ऑल द बेस्ट’; बारावीची परीक्षा आजपासून सुरु!