इंदुरीकर महाराज संतापले… म्हणाले आता तरी बंद करा रे!!

पुणे | आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चांगलेच गोत्यात सापडलेले प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर होत असलेली टीका त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. गेल्या 3-4 दिवसात इंदुरीकरांनीही विविध ठिकाणी झालेल्या कीर्तनातून उद्वीग्न प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तुम्हाला लोटांगण घालतो पण तुम्ही कॅमेरा दोन -चार दिवस तरी बंद ठेवा. वाटलं तर लोटांगण घालत तुमच्यापर्यंत येतो पण बंद ठेवा. तुम्ही ते नाटक करू नका. तुम्ही आता माणूसच संपवून टाकताल, असं इंदोरीकर यांनी आपल्या कीर्तनात म्हटलं आहे. आज इंदुरीकरांचं मोशी येथे कीर्तन पार पडलं. त्यावेळी ते बोलत होते.

माझा मुलगा शाळेत जात नाही. माझ्या घरातील वातावरणही विस्कळीत झालं आहे. त्यातल्या त्यात  माझं अर्धा किलो वजनंही कमी झालं असल्याचं म्हणत इंदोरीकर विविध कीर्तनात आपल्या उद्वीग्न प्रतिक्रिया मांडत आहेत.

दरम्यान, महाराज तुम्ही फक्त आवाज द्या आम्ही ताकदीनिशी तुमच्या समर्थनार्थ उतरू, असं म्हणत भाजप आमदार महेश लांडगे यांनी प्रत्यक्षपणे महाराजांना पाठिंबा जाहीर केला.

महत्वाच्या बातम्या-

-इंदुरीकर महाराजांविरोधात अखेर तृप्ती देसाईंनी उचललं मोठं पाऊल!

-“इंदुरीकरांच्या कीर्तनात कीर्तन कमी आणि तमाशाच जास्त असतो”

-अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकणार लग्नबंधनात?

-‘ऑल द बेस्ट’; बारावीची परीक्षा आजपासून सुरु!

-एल्गार परिषदेच्या तपासासंदर्भात शरद पवार म्हणतात…