इंदुरीकर महाराजांविरोधात अखेर तृप्ती देसाईंनी उचललं मोठं पाऊल!

पुणे | पुत्रप्राप्तीसाठी ऑड इव्हनचा फॉर्म्युला सांगणारे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकरांविरोधात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्या आज अहमदनगरमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी जाणार असल्याचं देसाईंनी सांगितलं आहे.

इंदुरीकर वारंवार आपल्या कीर्तनातून महिलांचा अपमान करत असतात. त्यांनी सांगितलेल्या फॉर्म्युल्यामुळे त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कलमानुसार गुन्हा दाखल झालाच पाहिजे. ते नेहमी आपल्या कीर्तनातून महिलांना दुय्यम स्थान देतात यासंदर्भातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही आक्रमकपणे भूमिका घेणार आहोत, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

आमच्या या मागण्यासाठी जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला 18 तारखेला अहमदनगरला यावं लागेल. असं सांगितलं होते. त्यामुळे माझ्या शिष्टमंडळासह नगरच्या एसपींकडे इंदुरीकरांवर तातडीने गुन्हा दाखल करा या मागणीसाठी जात आहोत, असं तृप्ती देसाईंनी सांगितलं आहे.

इंदुरीकर महाराजाच्या समर्थनार्थ आज नगरमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल झाला तर मोर्चा काढू असा इशारा इंदुरीकरांच्या समर्थकांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“इंदुरीकरांच्या कीर्तनात कीर्तन कमी आणि तमाशाच जास्त असतो”

-अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकणार लग्नबंधनात?

-‘ऑल द बेस्ट’; बारावीची परीक्षा आजपासून सुरु!

-एल्गार परिषदेच्या तपासासंदर्भात शरद पवार म्हणतात…

-कडक सॅल्यूट… भीषण अग्नीतांडवात स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यानं तिरंगा वाचवला!