पित्ताचा त्रास होतोय? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन बघा

दैनंदिन धावपळीच्या जीवनात अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे पित्ताचा त्रास उद्भवत असतो. त्यामुळे पित्ताचा त्रास टाळायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

पित्तामुळे छातीत जळजळ, उलट्या, अपचनाचा त्रास जाणवतो. अशाप्रकारे वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. पित्ताचा त्रास कमी करण्याचा एक हमखास उपाय म्हणजे शहाळ्याचे पाणी. थंडगार पाणी प्यायल्याने पचनाचा मार्ग सुधारतो. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी पिकलेले केळ खावे. पिकलेले केळ खाल्यानं शरीराला आराम मिळतो. केळामधून शरीराला उच्च प्रतिचा पोटॅशअम पुरवठा होतो. त्यामुळे पोटात आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबर शरीराची पचनक्रिया सुधारते.

आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे बारीक करून पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर पाणी कोमट झाल्यावर प्यायल्यानं पित्तापासून आराम मिळतो.

तुमच्या आहारातील थंड दुधाच्या समावेशानं, पोटातील अतिरिक्त आम्लं शोषलं जातं. थंड दुधात एक चमचा सब्जा पित्तासाठी अतिशय गुणकारी ठरतं. त्यामुळे आपल्या आहारात दुधाचं समावेश करा. दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबते व अतिरिक्त आम्ल दुध खेचून त्याचे अस्तित्व संपवते. थंड दुध प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते.

आल्याच्या सेवनानं पचन सुधारते. आल्यातील तिखट व पाचक रसांमुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक छोटा तुकडा चघळत रहा. तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावरथोडा गुळ टाकून चघळत रहा.

लिंबू, आवळा, संत्रा, पेरु यासारखी फळं ‘क’ जीवनसत्तयुक्त आहेत. ही फळं आंबट असल्यामुळं अनेकांना यामुळं पित्त वाढेल अशी भिती असते. मात्र ‘क’ जीवनसत्त्वयुक्त असलेली ही फळं पित्तायाठी परिणामकारक ठरतात.

बडीशेपदेखील पित्तासाठी गुणकारी असते. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. बडीशेपमधील एन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते.

पित्त कमी करणाऱ्या पदार्थांचे सेवन करा. जसं की, दुध, तूप, लोणी हे उत्तमरीत्या पित्त कमी करते. मध आणि काकवी सोडून बाकी गोड वस्तूंचा वापर करू शकता.

पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो. पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरही पुदिना गुणकारी आहे.

पित्तासाठी अँटासिड गोळया बाजारात आहेत. पण घरगुती उपचारात 1/4 चमचा ज्येष्ठमध पावडर दूध अथवा पाण्यातून दिवसातून दोन वेळा तीन दिवस घेण्याने पित्ताचा त्रास कमी होतो

महत्वाच्या बातम्या –

बॉलीवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करतेय दुसऱ्यांदा लग्न? बडा अभिनेता आहे तिचा होणारा नवरा

Toyato ने भारतात लाॅंच केली ही भन्नाट कार; जाणून घ्या किंमत

बापरे! मगरीची परत दहशत, शार्कलाच गिळंकृत केलं- पाहा व्हिडीओ

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा; फोटो व्हायरल

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज… आता आला ‘सीएनजी’वर चालणारा ट्रॅक्टर