तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भविकांना करावी लागणार 31 मार्चपर्यंत प्रतिक्षा

उस्मानाबाद |  महाराष्ट्रात प्रत्येक दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

मंदिरातले सगळे विधीही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तूर्तास तरी 31 मार्चपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र कोरोनाची प्रादुर्भाव जर वाढला तर पुढील निर्णय घेण्यात येईल, असंही मंदिर प्रशासनाने सांगितलं आहे.

दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 37 वर जाऊन पोहचली आहे. आज सकाळी मुंबईत 3 तर नवी मुंबईत 1 कोरोना रूग्ण आढळला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, तुळजा भवानी मंदिर ज्या मराठवाड्यातून येतं त्या मराठवाड्यात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. औरंगाबादेतील एका शिक्षिकेस कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच धास्तावलेले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“कोरोना व्हायरस म्हणजे अल्लाहने चीनला दिलेली शिक्षा आहे.”

-उद्धव ठाकरेंनी का बरं राजीनामा द्यावा? तृप्ती देसाईंचा चंद्रकांत पाटलांना सवाल

-चिकन, मटन, मासे बिनधास्त खा आणि तंदुरस्त रहा; मुख्यमंत्र्यांची फेसबुक पोस्ट

-बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंद कोरोनामुळे अडकला जर्मनीत

-मागची 5 वर्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते- चंद्रकांत पाटील