मुंबई | राज्य सरकार कोरोनावर आळा घालण्यासाठी अनेक उपाय योजना राबवात आहे. मात्र तरीही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच मुंबई आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 47 वर पोहोचला आहे
मुंबईतील 22 वर्षीय महिला इंग्लंडवरुन परतली आहे. तिला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. तर उल्हासनगरमधील 49 वर्षीय महिला दुबईवरुन आली असून, तिला सुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे.
पुणे, मुंबई, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, कल्याण या ठिकाणी कोरोनाचे रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नुकतंच रत्नागिरीत कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अल्पक्षा लॉकडाऊन लागू केलं आहे. मात्र कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुंबई महापालिकेने दंड वाढवल्यावरही थुंकोबांकडून एका दिवसात तब्बल इतका दंड वसूल
-धक्कादायक! कोरोनामुळे इटलीत एका दिवसात 475 जणांचा मृत्यू
-कोरोनापासून वाचण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन
-कोरोनामुळे पुण्यातील 584 पीएमपीएमएलच्या फेऱ्या बंद
-“आम्ही पण भारतीय, आम्हाला कोरोना म्हणणं बंद करा”; पाहा व्हिडीओ