मुंबई : भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा पार पडला. या मेळाव्याला नुकतेच भाजपवासी झालेल्या नेत्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांनी या मेळाव्याला दांडी मारली आहे.
उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीमध्ये असताना अनेकवेळा पक्षनेतृत्वावर तोफ डागली होती. तसेच त्यांच्यावर अनेकदा पक्षशिस्तीचा भंग केल्याचाही आरोप करण्यात आला होता.
भाजपचे कार्यकारी अध्यक्षांनी घेतलेल्या मेळाव्याला उदयनराजेंनी दांडी मारली. यामुळे उदयनराजेंनी भाजपला पक्षप्रवेशानंतर पहिलं गिफ्ट दिल्याची चर्चा सुरू आहे.
जेपी नड्डा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. भाजपाने केंद्रात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रभक्ती आणि एकतेची ही लढाई आहे.
दरम्यान, उदयनराजेंनी आपल्या पदाचा राजीनामा देत काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र पक्ष प्रवेशानंतर पक्षांध्यक्षांच्या पहिल्याच बैठकीला उदयनराजेंनी दांडी मारली आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील ‘या’ जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अजूनही रस्सीखेच – https://t.co/NBKSE1W1gP @NCPspeaks @INCMaharashtra @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्यासाठी सर्व नेत्यांना एकत्र यावं लागेल- नितीन राऊत – https://t.co/JhWvXto2g5 @NitinRaut_INC @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
“सत्ताधारी पक्षाचा आमचं सँडविच करण्याचा डाव होता” – https://t.co/j4KxEbdLmt @BJP4Maharashtra @NCPspeaks @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019