बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’ची धूमाकूळ; उदयनराजे म्हणतात…

मुंबई | बॉलिवूड अभिनेता अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला ‘तानाजी’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पहिल्या दोन दिवसांत या सिनेमाने बक्कळ कमाई केल्याचंही पाहायला मिळालं. तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित असलेला हा सिनेमा महाराष्ट्रातही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्याबाबत भाजप नेते उदयनराजे भोसलेंनी ट्वीट केलं आहे.

‘तानाजी द अनसंग वॉरीयर’ या चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अजय देवगण यांची प्रशंसा करावी एवढी कमीच आहे. त्यांना पुढील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तसेच यापुढे ही ते आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील हीच अपेक्षा, असं ट्वीट उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातून तानाजी सिनेमावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तानाजी आणि छपाक हे दोन्ही सिनेमे महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याची भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे, उदयनराजे भोसले यांनी या सिनेमाची तोंड भरून स्तुती केली आहे. तसंच भविष्याबाबत अजय देवगणकडून अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अजय देवगणचा तान्हाजी आणि दीपिकाचा ‘छपाक’ दोन्ही सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित झाले असून दोन्ही छपाकने 8 कोटींची तर तान्हीजीने 18 कोटींची कमाई केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-