जावई बापूंनी जरा डोंबिवलीकडे लक्ष द्यावे; मनसे आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई | डोंबिवलीतील प्रदुषण वाढत आहे. तसेच शहराच्या दुरावस्थेला एमआयडीसी जबाबदार ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री हे डोंबिवलीचे जावई आहेत. त्यामुळे त्यांनी या शहरावर लक्ष द्यावे, असा टोलाही राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. गेल्या 25 वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेनेची सत्ता आहे.

डोंबिवली शहराची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याकडे अधिकाऱ्यांचं लक्ष नाही त्यामुळे हे घडत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ यात लक्ष घालावे. याबाबत आम्ही आंदोलन तरी किती वेळा करणार, असंही पाटील म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत. हे मी कोणत्याही टीका करण्याच्या हेतूने म्हणत नाही. तर त्यांनी याकडे लक्ष द्यावे आणि डोंबिवली शहर सुधारावे असं मला वाटतं, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-