‘त्याचं’ आम्ही बघून घेऊ; उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

मुंबई : शिवसेना आणि भाजप हे युतीत आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहेत. तसेच आमचं ठरलं आहे असंही शिवसेना-भाजपचे वरिष्ठ नेते सांगत आहेत. मात्र, या निवडणुकीपूर्वीच जागावाटपावरून वाद निर्माण होत असल्याचं दिसत आहे. कारण, दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जुन्या फॉर्म्युल्याविषयी वक्तव्य करत यंदा आम्ही अधिक जागा मागणार असल्याचं म्हणाले. त्यानंतर आता यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे.

शिवसेना-भाजप युतीमध्ये जागावाटपाचा निर्णय हा मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा तिघे मिळून ठरवू. जागावाटपाचा अधिकार आम्हा तिघांना आहे, असं वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

रविवारी बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे.

शनिवारी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीमधील फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला कठीण आहे. 135 जागांवर आमचं भागणार नाही. त्यामुळं आम्हाला विधानसभा निवडणुकीसाठी आणखीन जागा वाढवून पाहिजेत आणि त्या प्रकारची मागणी शिवसेनेकडे करणार आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. 

महत्वाच्या बातम्या-

ve