“जी लोकं गेली 50 वर्ष आपल्याशी जसंं वागली, तीच परिस्थिती आज त्यांच्यावर आली”

मुंबई : मला कुणाचे वाईट होत असताना आनंद होत नाही पण जे गेले 50 वर्षे आपल्याशी जसे वागले त्यांचं काय झालं? त्यांना परस्पर उत्तर मिळत आहेत, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

हा महाराष्ट्र कुणाशी सुडाने वागत नाही. आम्ही कुणाशी सुडाने वागणार नाही. पण आसूड ओढतो. असाच एक क्षण आपल्यावर आला होता, बाळासाहेबांना अटक करण्यासाठी दंड थोपटले होते, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

उस्फूर्तपणे त्यावेळी जनता रस्त्यावर उतरली होती. सरकार कुणाचे काय होते ते स्पष्ट आहे. आम्ही कुणाच्या मध्यस्थीसाठी गेलो नव्हतो, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

न्यायमूर्ती म्हणाले केसच होऊ शकत नाही. बाळासाहेब कुठले डायरेक्टर नव्हते…फायली अफरातफर नव्हती. हिंदूंचे रक्षण करणं हा गुन्हा होता? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित करत, शरद पवारांच्या ईडी कार्यालय भेटीवर भाष्य केलं.

दरम्यान, मी राजकारण सोडणार नाही, शेती करणार नाही, मी मुख्यमंत्रीपदावर बसवून दाखवेन, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या-