मी राजकारण सोडणार नाही…. शेती करणार नाही; उद्धव ठाकरेंचा निशाणा

मुंबई |  मी राजकारण सोडणार नाही, शेती करणार नाही. शिवसेना ही सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना आहे. मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवूनच दाखवेन, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. तसेच पवारांवर होत असलेल्या कारवाईवर मार्मिक भाष्य केलं.

मला कुणाचे वाईट होत असताना आनंद होत नाही पण जे गेले 50 वर्षे आपल्याशी जसे वागले त्यांचं काय झालं? त्यांना परस्पर उत्तर मिळत आहेत, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र कुणाशी सुडाने वागत नाही. आम्ही कुणाशी सुडाने वागणार नाही. पण आसूड ओढतो. कर्माने मरणार आहे त्याला धर्माने कशाला मारायचं? असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, येत्या 2 ते 3 दिवसांत युतीची घोषणा होईल, असंही उद्धव यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-