मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर उद्धव ठाकरेंनी काढला चिमटा

मुंबई | अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या नावाने ट्रस्टची स्थापना करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेमध्ये केली. यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करण्याचे ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे सरकारचं कर्तव्यच होतं. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करणयाचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राम मंदिराच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टचे नाव श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट असं ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती मोदींनी आज लोकसभेत दिली.

दरम्यान, अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय दिला. अयोध्येतील ती वादग्रस्त जमीन ही रामलल्ला म्हणजे हिंदू पक्षांना देण्यात आली आहे. यानंतर आज लोकसभेत नरेंद्र मोदींनी राम मंदिराबाबत निवेदन दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-“गुदमरत राहण्यापेक्षा बरं झालं की माझ्या आई-बाबांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला”

-सोशल मीडिया अकाऊंटला ‘आधार कार्ड’ जोडून घेण्यावर मोदी सरकारचा मोठा खुलासा!

-‘ECONOMY त्रस्त, मोदी मस्त’; गायक विशाल दादलानीने लगावला मोदींना टोला

-मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा!

-67एकर जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला हस्तांतरित करणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा