“…मी काडीची किंमत देत नाही”, उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंवर निशाणा

मुंबई | मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या भोंग्यांच्या आंदोलनावरून राज्यातील वातावरण चांगलंच पेटल्याचं पहायला मिळतंय. राज ठाकरे यांची येत्या 1 तारखेला सभा होणार आहे. त्यावरून आता

अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झाली आहे, आगडोंब उसळला आहे, जळजळतंय, मळमळतंय काही कळत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

राज्यातल्या किती राजधान्यांमध्ये, शहरांमध्ये मुंबईच्या शाळेचा दर्जा अंगीकारुन दाखवला आहे हे दाखवावं, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

काम काहीच नाही आणि बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग असून मी काडीची किंमत देत नाही, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

लवकरच मी एक जाहीर सभा घेणार आहे. सगळ्यांचा सोक्षमोक्ष मला लावायचा आहे. जे नकली व तकलादू हिंदूत्ववादी आले आहेत, मला त्यांचा समाचार घ्यायचा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का?, घालावं आणि मग सोडावं. जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी हिंदुत्वासाठी काय केलं आहे?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं प्रत्युत्तर; CCTV व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

चोरट्यांचा नाद खुळा! थेट बुलडोझरने फोडलं ATMचं मशीन; पाहा व्हिडीओ

भर मांडवात नवरा बायकोची हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ 

‘….हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही’; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका 

मोठी बातमी! राज ठाकरेंना झटका, सभेपूर्वी पोलिसांनी उचललं मोठं पाऊल